Wednesday, April 22, 2015

१० वी सायन्स ऍ़ण्ड टेक्नोलॉजी - प्रास्ताविक

इयत्ता १० वी च्या सायन्स ऍ़ण्ड टेक्नोलॉजी विषयासाठी निर्माण केलेल्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. हा ब्लॉग खालील उद्देशांने बनविला आहे.
  1. सायन्स ऍ़ण्ड टेक्नोलॉजी विषयाच्या अभ्यासासंबंधी मार्गदर्शन.
  2. या विषयासंबंधी उपलब्ध विविध रिसोर्सेस्.
  3. सायन्स ऍ़ण्ड टेक्नोलॉजी विषयाची HOTS क्वेश्चनबॅन्क.
इयत्ता १० च्या सायन्स ऍ़ण्ड टेक्नोलॉजी विषयामध्ये १५ चॅप्टर्स आहेत. त्यांची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.
  • Physics (4 Chapters) (All in Section A)
    • (Ch 4) The Electric Spark
    • (Ch 5) All About Electromagnetism
    • (Ch 6) Wonders of Light - Part 1
    • (Ch 7) Wonders of Light - Part 2
  • Chemistry (5 Chapters) (3 Chapters in Section A, 2 in Section B)
    • (Ch 1) School of Elements
    • (Ch 2) The Magic of Chemical Reactions
    • (Ch 3) The Acid Base Chemistry
    • (Ch 8) Understanding Metals and Non-metals
    • (Ch 9) Amazing World of Carbon Compounds
  • Biology (4 Chapters)
    • (Ch 10) Life's Internal Secrets
    • (Ch 11) The Regulators of Life
    • (Ch 12) The Life Cycle
    • (Ch 13) Mapping of Genes
  • Environment (2 Chapters)
    • (Ch 14) Striving for Better Environment - Part 1
    • (Ch 15) Striving for Better Environment - Part 2
Physics च्या अभ्यासक्रमासंबंधी काही तथ्ये
इयत्ता ९ वी मध्ये शिकलेल्या पाठांपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारचे पाठ यावर्षी आहे. Physics विषयाचे सामान्यपणे खालीलप्रमाणे विभाजन करता येते.
  • Newtonian Physics (Classical Mechanics)
  • Electromagnetism and Light
  • Quantum Mechanics
इयत्ता ९ वी मध्ये आपण Newtonian Physics शिकतो, तर या वर्षी Electromagnetism and Light हा विभाग प्रामुख्याने शिकायचा आहे (Light हे Electromagnetic Radiation च आहे). त्यामुळे वर वर पाहता ९ वी चे Physics व १० वी चे Physics पूर्ण वेगळे आहे. मात्र ११ वी व १२ वी मध्ये Newtonian Physics व Electromagnetism and Light हे दोन्ही विभाग असणार आहेत व Quantum Mechanics ची ओळखही करुन घ्यावी लागणार आहे. ज्यांना १० वी नंतर सायन्स विषयात करीयर करायचे आहे त्यांनी ९ वी पासूनच सायन्स विषयाचा गांभीर्याने अभ्यास करणे गरजेचे आहे.

Electricity व Electromagnetism (Ch. 4 and 5) हे घटक खरे तर खूप सोपे आहेत. त्यातल्या त्यात Electromagnetism (Ch 5) हा घटक थोडा अवघड जातो, कारण त्यात 3D Visualization करणे गरजेचे असते (Fleming's laws, working of motor, generator etc.).

Chemistry अभ्यासक्रमासंबंधी काही तथ्ये
८ वी पर्यंत आपल्याला Chemical Reactions लिहिण्याचा थोडा सराव झाला होता. ९ वी मध्ये आपण एकही रिऍ़क्शन लिहिली नाही. ९ वी मधील पहिले दोन घट‍क Physical Chemistry विभागाचे होते. त्यात आपण पदार्थाची रचना, Physical States, Mixtures, Separation Techniques अशा गोष्टी शिकलो. उर्वरित दोन घटकांत आपण अणूची रचना, Electronic Configuration, Valency अशा गोष्टी शिकलो. यातील Electronic Configuration, Valency हे घटक यावर्षी खूप उपयोगी ठरणार आहेत.

पहिल्या २० मूलद्रव्यांची Electronic Configurations तसेच त्यांच्या Valencies पाठ असणे खूप उपयोगाचे ठरणार अाहे. या गोष्टी पाठ नसतील तर त्या पाठ कराच. या वर्षी १०० च्या आसपास Chemical Reactions आपल्याला लिहायच्या आहेत. Chemical Reactions लिहिता आल्या तर Chemistry मध्ये अवघड काहीच नाही.

Biology अभ्यासक्रमासंबंधी काही तथ्ये
यावर्षीच्या सायन्समध्ये सर्वात Interesting जर काही असेल तर हे ४ घटक आहेत. विविध Organ Systems कशा काम करतात हे पहिल्या घटकात सांगीतले आहे. Control/Coordination, Nervous System या गोष्टी दुस-या घटकात आहेत. तिसरा घटक Reproduction वर आधारित आहे, तर, शेवटचा घटक अनुवांशिकता व उत्क्रांती प्रक्रियेवर आधारित आहे.

Biology चे हे सर्व घटक म्हणजे एखाद्या गोष्टीसारखे उलगडत जाणारे आहेत. समजून घेतले तर यांचा अभ्यास करणे मुळीच अवघड नाही.

Environment अभ्यासक्रमासंबंधी काही तथ्ये
हे दोन घटक पर्यावरण विषयावर आधारित आहेत. यात प्रदूषणाचे विविध स्रोत, त्यांचे परिणाम, प्रदूषण कमी करण्याचे उपाय यांचा उहापोह केला आहे.

Weight-age

Chapter Marks without options Marks with Options
Physics : (Ch 4) The Electric Spark (Section A) 5 8
Physics : (Ch 5) All About Electromagnetism (Section A) 6 7
Physics : (Ch 6) Wonders of Light - Part 1 (Section A) 7 8
Physics : (Ch 7) Wonders of Light - Part 2 (Section A) 6 7
Chemistry : (Ch 1) School of Elements (Section A) 4 5
Chemistry : (Ch 2) The Magic of Chemical Reactions (Section A) 4 5
Chemistry : (Ch 3) The Acid Base Chemistry) (Section A) 4 5
Chemistry : (Ch 8) Understanding Metals and Non-metals (Section B) 7 8
Chemistry : (Ch 9) Amazing World of Carbon Compounds (Section B) 5 7
Biology : (Ch 10) Life's Internal Secrets (Section B) 6 8
Biology : (Ch 11) The Regulators of Life (Section B) 6 7
Biology : (Ch 12) The Life Cycle (Section B) 6 7
Biology : (Ch 13) Mapping of Genes (Section B) 6 8
Environment : (Ch 14) Striving for Better Environment - Part 1 (Section A) 4 5
Environment : (Ch 15) Striving for Better Environment - Part 2 (Section B) 4 5

Format

  • 1 Mark Questions (Fill in the blanks/True-False/Odd Term/Match Pairs) (5 Marks)
  • MCQs (5 Marks)
  • 2-Mark Questions (5 out of 6) (10 Marks)
  • 3-Mark Questions (5 out of 6) (15 Marks)
  • 5-Mark Question (1 out of 2) (5 Marks)